*जाहीर सूचना*
शिरपूर शहरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, आमोदे गावात कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे दि. २३ एप्रिल २०२० पासून चौदा दिवसांकरीता तीन किमी त्रिज्येच्या परिसरात *कंटेनमेंट झोन* जाहीर करण्यात आला होता. ही मुदत दि. ७ मे २०२०रोजी संपत आहे. मात्र महाराष्ट्र शासनाने दि. २ मे २०२० रोजी पारीत केलेल्या आदेशानुसार *धुळे जिल्हा रेड झोन मध्ये समाविष्ट* आहे. त्यामुळे *दि. ८ मे २०२० ते दि. १७ मे २०२० या काळात* शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रात लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात यावे.
लॉकडाऊनच्या काळात पुढील कामे व आस्थापना *पूर्णपणे बंद* राहतील.
१) सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक / कोचींग क्लासेस , हॉटेल, रेस्टॉरंटसह आतिथ्यसेवा, लॉजींग , चित्रपटगृहे, शॉपींगमॉल, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, सर्व सामाजिक/ राजकिय/ क्रीडा/ मनोरंजन/ शैक्षणीक/ सांस्कृतिक/ धार्मिक कार्यक्रमासाठी एकत्र येणे, धार्मिक स्थळे / प्रार्थनास्थळे येथे पूजा करणे यांना मनाई आहे.
२) अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणासाठी रात्री ७ ते सकाळी ७ या काळात घराबाहेर पडण्यास मनाई राहील.
३) ऑटो रीक्षा, टॅक्सी, कॅब बंद राहतील .
४) कटींग सलून, स्पा, पार्लर बंद राहतील.
५) पान तंबाखूची दुकाने बंद राहतील.
*लॉकडाऊनच्या काळात पुढील कामांना काही अटीशर्तीवर परवानगी असेल.*
१) विशीष्ट कारणांसाठी खाजगी वाहनांस परवानगी असेल मात्र चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि दोन प्रवाशांना परवानगी राहील. दुचाकी वाहनांवर एकाच व्यक्तीस परवानगी असेल.
२) शहरातील व्यापारी संकुलात आणि बाजरपेठेत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकानांना परवानगी नाही. मात्र इतरत्र आणि रहिवासी भागात स्वतंत्र दुकाने चालू ठेवण्यास परवानगी आहे.
३) जीवनावश्यक वस्तू ऑनलाईन विकण्यास परवानगी आहे.
४) दवाखाना, ओपीडी चालू ठेवावीत.
५) शहरी भागातील बांधकामांना स्थानिक मजूर उपलब्ध असल्यास बाहेरून मजूर न आणण्याच्या अटीवर परवानगी आहे.
६) खाजगी कार्यालयात ३३% उपस्थितीस परवानगी असेल.
७) दारूची दुकाने दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर (किमान ६ फूट) ठेवून चालू ठेवण्यास परवानगी आहे. दुकानात एका वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित नसतील याची दक्षता घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, पान तंबाखू खाणे यास मनाई आहे.
८) सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक आहे.
९) पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई आहे.
१०) लग्नसमारंभास ५० पेक्षा अधिक लोकांना आणि अंत्यसंस्कारास २० पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.
नियमांचे उल्लंघन करणारे नागरीक व व्यावसायिक याच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि सीआरपीसी १४४ अन्वये कठोर कारवाई केली जाईल.
*याकाळात शहर अथवा परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास अशा ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषीत जाहीर केला जाईल. आणि वर दिलेल्या तरतूदी रद्द करण्यात येतील* ,
याची नोंद घ्यावी.
*प्रांताधिकारी, शिरपूर*
*तहसीलदार, शिरपूर*
*पोलीसनिरीक्षक, शिरपूर*
*मुख्याधिकारी , शिरपूर न.प.*
No comments:
Post a Comment