Thursday, June 25, 2020

रोहिणी ग्रामस्थांना महत्वाची सूचना

ग्रामपंचायत रोहिणी ग्रामस्थाना कळविण्यात येते कि, गटविकास अधिकारी प स शिरपूर तसेच उपविभागीय अधिकारी शिरपूर भाग शिरपूर यांचेकडील आदेशानुसार गावात लग्न तसेच अंत्यविधी कार्यक्रमाच्या ठिकाणी अनावश्यक गर्दी न होऊ देणे बाबत सूचना दिल्या आहेत त्या अनुषंगाने सर्व गावातील ग्रामस्थाना विनंती करण्यात येते की गावातील लग्न समारंभा करिता जवळचे आप्त स्वकीय नातेवाईक मिळून ५० व्यक्ती तसेच अंत्यविधी कार्यक्रमाकरिता जवळचे आप्त स्वकीय नातेवाईक मिळून २० व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी शासनाने दिली आहे. करिता आपलें ग्रामपंचायत रोहिणी अंतर्गत होणारे  विवाह सोहळे अथवा अंत्यविधी कार्यक्रम वरील प्रमाणे नमूद संखेनुसारच व सोशल डिस्टन्स पाळून पार पाडावेत त्याचप्रमाणे सदर आदेशानुसार योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास व विनाकारण जास्त गर्दी केल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची नोंद घ्यावी.त्याचप्रमाणे शिरपुर शहर तसेच ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण संख्येत वाढ़ होत असल्याने आपण ग्रामपंचायत रोहिणी तसेच प्राथमिक आरोग्य रोहिणी यांचे कडून  आलेल्या सूचनांचे पालन करावे व अनावश्यक कामाकरिता बाहेर जाणे टाळावे तसेच मास्क अथवा रुमाल तोंडाला बांधावे,वेळोवेळी हाथ साबणाने धुवावे तसेच दोन व्यक्तीमध्ये किमान 4/5 फुटाचे अंतर ठेवावे  ही विनंती 
सरपंच ग्रां.प रोहिणी 
ग्रामसेवक ग्रां.प रोहिणी 
पोलीस पाटील ग्रां.प रोहिणी

No comments:

Post a Comment