Sunday, May 10, 2020

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

*आई--* 

*आई म्हणजे काय असते ?*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आई म्हणजे काय असते ?
आई म्हणजे आई असते 
साऱ्या जगाची माई असते 

हसणाऱ्यांच्या सुखात असते 
रडणाऱ्याच्या दुःखात असते 
पळणाऱ्यांच्या पायात असते
उडणाऱ्यांच्या पंखात असते
जगात आई सर्वत्र असते

आई म्हणजे काय असते ?
कापसाची मऊ रुई असते 

पोटाला चिमटा देऊन 
बाळाचे पोट भरविते 
स्वतः दुःखात राहूनी 
इतरांचे मोट चालविते 
सर्वांना जागविणारी 
ती आईच असते

आई म्हणजे काय असते ? 
औषधाने भरलेली सुई असते. 

आई म्हणजे काय असते ?
थंडगार पाण्याची सूरई असते

आई म्हणजे काय असते ?
मंजुळ गाण्याची सनई असते

आई म्हणजे काय असते ?
थंड दुधावरची मलई असते.

'आ' म्हणजे आत्मा, 'ई' म्हणजे ईश्वर. आई हीच ईश्वर आहे. तिची सेवा केल्यानं जीवनात नित्य सुखाचा मेवा मिळत राहिल.आपल्या संस्कृतीत 'आई'ला परम दैवत मानले असून 'मातृदेवोभव' असं म्हंटलं आहे. 
*मातृदिनानिमित्त सर्व ईश्वरस्वरुप मातांना हार्दिक शुभेच्छा.*💐💐🙏

No comments:

Post a Comment